
लोणावळ्यात मनसेचा शिक्षणासाठी लढा; विद्यार्थ्यांना मिळाला न्याय
लोणावळा शहरातील मनसेने सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावत धडाकेबाज कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध करत, विद्यार्थ्यांची फी न भरल्याने होणाऱ्या अडवणुकीवर कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कुसगाव बु. येथील श्री. जगन्नाथ कांबळे यांनी मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधून, “किंग्जवे शाळेने माझ्या तीन मुलांचे दाखले 53,000 रुपयांची फी थकीत असल्याने रोखले आहेत,” अशी माहिती दिली. ही शाळा आता परवानगी नसल्याने बंद असून, दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी दाखल्यांची आवश्यकता होती. कांबळे यांची आर्थिक स्थिती पाहून मनसेने तत्काळ कारवाई करत, शाळेत जाऊन अध्यक्ष निखिल भोसले व प्रवक्ते अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवी (१० वी), साक्षी (६ वी), आणि आदित्य (४ थी) यांचे दाखले मिळवून दिले. कांबळे कुटुंबियांनी मनसेचे आभार मानले. या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अशा अडचणीसाठी मनसेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.