MPN Marathi

काय लाईन, काय लेन्थ, काय टप्पा, सगळंच ओक्के, वर्षाने कमबॅक, ४ विकेट्स घेतल्या, शमीचा भेदक मारा – News18 मराठी

Border Gavaskar Trophy 2024, Ind vs Aus : येत्या 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू मैदानात कसून सराव करतायत. अशात वर्षभरानंतर मैदानात पुनरागमन करणारा टीम इंडिय़ाचा गोलंदाज मोहम्मद शमी रणजीत भेदक गोलंदाजी करतो आहे.मध्यप्रदेश विरूद्धच्या सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होणार आहेत. आणि ऑस्ट्रेलियाच टेन्शन चांगलच वाढणार आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीनंतर मैदानात जबरदस्त कमबॅक केलं आहे. शमी रणजी ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत बंगालकडून खेळताना मोहम्मद शमीने मध्य प्रदेश विरूद्ध 4 विकेटस घेतल्या आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

बंगालने पहिल्या डावात 288 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायचा उतरलेल्या मध्य़प्रदेश संघाला बंगालने 167 धावांवर गुंडाळल आहे. त्यामुळे बंगालने 61 धावांची आघाडी घेतली आहे.या सामन्यात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या आहेत. शमीने 19 ओव्हरमध्ये 54 धावा देत 4 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान बंगालच्या दुसऱ्या डावाला सूरूवात झाली असून त्यांनी आतापर्यंत 138 धावांवर 5 विकेट गमावले आहेत.अशाप्रकारे आता त्यांनी 200 डावांची लीड घेतली आह. त्यामुळे आता मध्यप्रदेशचे गोलंदाज बंगालला किती धावात रोखतात? आणि त्यांच्यासमोर विजयासाठी किती धावांचे आव्हान असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मोहम्मद शमी तब्बल वर्षभरानंतर पुनरागमन करतोय. आणि कमबॅक पहिल्याच सामन्यात त्याने धुव्वा उडवून दिला आहे. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत त्याची निवड झाली नाही आहे.मात्र त्याचा परफॉर्मन्स पाहता त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची झोप उडणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें