MPN Marathi

परदेशी माणसाचा फोन येतोय, ताई EVM मध्ये गडबड; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

नाशिक: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. परदेशी माणसाचा फोन येतोय, ताई मशीनमध्ये गडबड आहे असं सांगत आहे. बाबतची माहिती आपण निवडणूक आयोगाला देणार असल्याचं सुळेंनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाचा किंवा विरोधातील उमेदवाराची फसवणूक होऊ नये, असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, परदेशी माणसाचा फोन येतोय, ताई मशीनमध्ये गडबड आहे असं सांगत आहे. 170 सीट कसे निवडून येणार? काही मशीनमध्ये गडबड आहे, निवडणूक प्रक्रियेवर विश्वास आहे . भगरे सरांना, मला निवडून दिले त्यामुळे मला विश्वास आहे. साताऱ्यात पिपाणी आणि तुतारीत गडबड झाली नसती तर शशिकांत शिंदे निवडून आले असते हे मी म्हणत नाही ते म्हणत आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस पण कॉपी करून पास झाला. दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाले असे देवा भाऊ म्हणतात. साताऱ्यात पिपाणी नसती तर सीट गेली असती असे त्यांचे सहकारी म्हणत आहे.

सोयाबीन आणि कापसाला 7 ते 10 हजार क्विंटल हमीभाव देणार : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर हा देश उभा आहे. अन्न दात्याला जो दुखवेल तो सत्तेत बसू शकणार नाही. सोयाबीन आणि कापसाचे पीक आले पण हमीभाव मिळत नाही . भाषण करतांना माझ्या अंगावर काटा येतोय. सोयाबीन आणि कापसाला 7 ते 10 हजार क्विंटल हमीभाव देणार कारण आमचे ते कर्तव्य आहे.

लोकसभेत दणका बसल्यावर मी लाडकी झाले : सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीचे 32 यायला पाहिजे होती. या राज्यात सगळ्यात जास्त लाडकी बहीण मी आहे. लोकसभेत मी लाडकी नव्हते, नंतर दणका बसल्यावर मी लाडकी झाले. 1500 देऊन लाडकी होत नाही, बहिणींवर प्रेम करून बघा. आमच्या नात्याची 1500 रुपये किंमत लावली. मागितले असते तर सगळं देऊन टाकले असते असे देखील सुप्रिया सुळे म्हणाले.

सत्तेसाठी नाही चांगल्या सरकारसाठी 84 वर्षाचा माणूस फिरतोय : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाले, 84 वर्षाचा माणूस फिरत आहे. काल रात्री भांडण झाले, 7 सभा झाल्या. मुख्यमंत्री पद नको, सत्ता नको फक्त चांगलं सरकार येऊ दे यासाठी ते फिरत आहे. माझी सगळ्यात मोठी लढाई भाजपसोबत आहे. कांद्यावरून ती लढाई झाला. पियुष गोयल यांच्यासोबत भांडण झाले. कांदा नाफेड आणि एनसीसीएफमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे.

इमानदार असणे मोठी पदवी : सुप्रिया सुळे

कुणी बोललं तर डोळ्यात पाणी येत, घात झाला तर तीच महिला पदर खोचून झाशीची राणी होते. निवडणूक झाल्यावर कांद्याच्या भ्रष्टाचाराठी भगरे सर आणि मी आमरण उपोषणाला बसणार आहे. इमानदार असणे मोठी पदवी झाली आहे. शेतकऱ्यांना आणि महिलांना आपण आधार देणार आहे. पैसे देऊन मतदान करा असे उद्योग आम्ही करणार नाही, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें