Care Tips: तुम्ही सकाळी तुमची कार सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. खरे तर सकाळी गाडी सुरू केली की तिचे इंजिन एकदम थंड झालेले असते. अशा स्थितीत इंजिन सुरू करताना काही टिप्स फॉलो कराव्यात. तुम्ही असे न केल्यास, कारचे इंजिन खराब होऊ शकते.
इंजिन जास्त वेळ सुरू ठेवू नका : अनेकांना असे वाटते की, थंड इंजिन जास्त वेळ सुरू ठेवणे चांगले आहे, परंतु कार 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणे आवश्यक नाही. यापेक्षा जास्त वेळ कार सुरू ठेवल्याने इंधनाचा अनावश्यक खर्च होतो.
इंजिन हळू हळू गरम होऊ द्या: कार सुरू केल्यानंतर, थोडा वेळ चालवा आणि हळूहळू वेग वाढवा. इंजिन स्वतःच हळूहळू गरम होते, जे त्याचे परफॉर्मेंस सुधारते.
Mahindra XUV400 सेफ्टीमध्ये ठरली 5-स्टार SUV! अडल्टसह चाइल्ड सेफ्टीतही बेस्ट
एक्सीलरेटरचा अतिवापर करू नका: सुरू केल्यावर लगेच जास्त रेव्ह करू नका. असे केल्याने इंजिनवर दाब पडतो आणि इंधन जास्त लागते.
वेळेवर सर्व्हिसिंग करा: इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि इतर भागांची नियमित तपासणी केल्याने इंजिनची कार्यक्षमता चांगली राहते. यामुळे थंड वातावरणातही इंजिन लवकर गरम होते.
Maruti Dzire 2024: किती व्हेरिएंटमध्ये मिळणार ही कार? पाहा यांच्या किंमती किती
बॅटरी आणि इतर यंत्रणा तपासा: थंड हवामानात, बॅटरी व्होल्टेज आणि कूलेंट लेव्हल चेक करणे महत्त्वाचे आहे. बॅटरी कमकुवत असल्यास, सुरू करण्यात अडचण येऊ शकते.
एकूणच, सकाळी 30 सेकंद कार सुरू करणे तिच्या इंजिनसाठी पुरेसे आहे. जास्त वेळ सुरू ठेवल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो आणि इंजिनवर दबाव येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.



