पुणे मावळ : मान्यमारमधील एका रोहिंग्याने चक्क पुण्यात स्वत:चे घर बांधल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुजल्लीम खान असे या रोहिंग्या व्यक्तीचे नाव आहे. जुलै महिन्यात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिस तपासात त्याने पुण्यातील देहू रोड येथे जागा विकत घेत स्वत:चे घर बांधल्याचे समोर आले आहे.
दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी असे चार रोहिंग्या म्यानमारमधून बांगलादेश आणि बांगलादेशातून पुण्यात आले होते. हे सर्व जण देहूरोड परिसरातील गांधीनगर पंडित चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने चौघांवर कारवाई केली.
त्यांच्यातील मुजम्मिल मोहम्मद अमीन खान याने पुण्यातील देहू रोड येथे त्याचे घर बांधल्याचे समोर आले. तसेच त्याने स्वत:ची कागदपत्रे सादर न करता ५०० रुपयांत आधारकार्ड मिळवले. मुजल्लीम खान याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकादेशीर पद्धतीने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून ८० हजार रुपयांत ६०० चौरस फूट जागा विकत घेतली.
२०१३ मध्ये केली भारतात घुसखोरी
पोलिसांच्या माहितीनुसार, मुजम्मिल खान त्याची पत्नी आणि दोन मुलींसह मान्यमारमध्ये राहत होता. तेथील एका इस्लामिक संस्थेतून त्याने मौलाना कोर्स केला आहे. तिथे काम मिळत नसल्याने तो २०१२ च्या सुमारास कुटुंबाला घेऊन बांगलादेशात आला. पण बांगलादेशातही त्याला काम मिळाले नाही. भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये काम मिळेल, अशी माहिती त्याला मिळाली. २०१३ च्या मध्यात त्याने भारतात घुसखोरी करत कोलकत्याला आला. परंतु, तिथेही त्याला मनासारखे काम न भेटल्याने तो पुण्यात आला.
पत्नीचेही आधारकार्ड बनवून घेतले
पुण्यात आल्यानंतर तो देहुरोड परिसरात बेकायदेशीपणे राहत होता. याच परिसरात त्याने पैसे कमविण्यासाठी कपडे विकण्याचा व्यवसाय केला. तो ठाण्यातील भिवंडीतून कपडे आणून देहु रोड परिसरात विकत असे. भिवंडीतील एका दुकानातून त्याने ५०० रुपये देऊन बनावट आधारकार्ड तयार करून घेतले. त्यानंतर त्याने पत्नीचेही आधारकार्ड बनवून घेतले. त्यामुळे त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली. अश्या पद्धतीने सहजा सहजी ओळख पटून दिल्याने पुणेकरांचे सुरक्षा धोक्यात आली आहे का? असा प्रश्न सर्व पुणेकरांना पडलेला दिसून येत आहे.
१० वर्षांपासून भारतात वास्तव्य
मुजम्मिल खान कपडे विक्रीच्या व्यवसायानंतर सुपारीच्या व्यवसायात आला. सुपारी विक्रीचा व्यवसाय करताना तो देहू रोड परिसरातील गांधीनगर येथील चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला. मुजम्मिल खान याने चंद्रभागा कांबळे यांची 600 चौरस फूट जागा 80 हजार रुपयांत विकत घेतली आणि तिथेच घर बांधले. मुजम्मिल खान सुमारे 10 वर्षांपासून भारतीय असल्याचे दाखवत आपल्या कुटुंबासह तिथे राहत होता. सुपारी विक्रीचा व्यवसाय करताना त्याने भारताचे पासपोर्टही मिळवले.
पोलिसांत गुन्हा दाखल
जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी मुजम्मिल खाने याचे आधारकार्ड आणि पासपोर्ट जप्त केले आहे. त्याच्यावर देहु रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्यानमारमधील मुजम्मिल खान आणि इतर संशयितांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्यांना पत्र दिले.यापुढे असे बनावट पेपर बनवता येऊ नये या करिता पोलीस प्रशासनाने कुठलाही ठोस पाऊल उचललेला दिसून येत नाही मान्यमारमधील रोहिंगे या वरती देखील ठोस कार्यवाही काही केलेली दिसून येत नाही.



