पवनानगर : पवन मावळातील दुधीवरे,गेव्हडे,आपटी,आतवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा विश्वास टाकावे यांची बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच पुष्पा पांडुरंग घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सचिन कोकाटे,ग्रामसेवक संतोष हुजरे यांनी काम पाहिले.टाकवे यानाचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.यावेळी गणेश धनिवले,मुरली लोहर,वसंत म्हसकर,महादू केदारी,शंकर साठे,दत्ता साठे,मारुती टाकवे,दत्ता साबळे,संतोष मरगळे,परमुत शेंडे,अनिता शिलवणे, संगीता रवने,कैलास टाकवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच सुनंदा टाकवे यांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा ग्रामस्थांना विश्वास दिला.ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचांची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.



