राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने सरपंच दिपाली हुलावळे यांचा सन्मान

कार्ला–  नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून मावळ तालुक्यातील कार्ला  गावच्या विद्यमान सरपंच दिपाली दिपक हुलावळे   यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्ला  गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच दिपाली  हुलावळे यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
विकास कामांमुळे गावाला तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गावासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याने त्यांच्या यशस्वी कार्याची दखल दिल्लीतील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटयूटने घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ठ सरपंच पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सरपंच दिपाली हुलावळे  यांना पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री विजय राज, मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, वाईचे खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ,महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष  सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,सुरेश बाळ्या मामा म्हात्रे  निलेश लंके,अमोल कोल्है,राजाभाऊ वाजे,आमदार सुनिल शेळके आदींनी सरपंच हुलावळे  यांचे अभिनंदन केले.
यावेळी संसद भवन, राष्ट्रपती भवनला भेट देण्याचा बहुमान सरपंचांना मिळाला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल हुलावळे  यांचे मावळ तालुक्यातील सरपंच परिषदेच्या सरपंचांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें