आरोपीला कठोर शासन होण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी..परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद,व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन दर्शविला.

पवनानगर : परभणी येथील संविधान शिल्पाच्या  विटंबनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना पवना पंचक्रोशीतील महत्त्वाची असलेली पवनानगर बाजारपेठ आणि परिसर येथेही कडेकोट बंद पळण्यात आला.

या वेळी आंबेडकरी, बहुजन चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच आरोपीला कठोर शासन व्हायला हवे अशी मागणी करण्यात आली. या घटनेचा सूत्रधार कोण त्याचा लवकर  शोध लावण्यात यावा, परभणीत आंबेडकरी तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच कोबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे .पोलिसांच्या पी.सी.आर. मध्ये चळवळीतील एका तरुणाचा बळी पडलेला आहे याला जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यास निलंबित करावे अश्या मागण्यां यावेळी मांडण्यात आल्या. बळी पडलेल्या युवक सोमनाथ सुर्यवंशी याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मावळ तालुका आर.पी.आय चे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, मल्हारी घोडके, अंकुश सोनवणे, अतुल सोनवणे, उत्तम चव्हाण,नितीन बुटाला,अरविंद रोकडे,  दीपक यादव, अनिल भालेराव, शरद सोनवणे, मंगेश कदम, प्रशांत भालेराव,नीलेश यादव, प्रदीप वाघमारे, हिरामण आढाव, हमीद शेख, सयाजी यादव, किशोर शिर्के, दत्ता गायकवाड, राजू शिंदे, देवानंद भालेराव, अशोक जाधव, मुकेश भालेराव, किसन मोरे आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें