KAMSHET NEWS – महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था पुणे संचलित अनुदानित आश्रमशाळा कामशेत च्या विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडील वाटचाल.

कामशेत – मावळ तालुक्यातील कामशेत शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कृषी विषयक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक ४ गुंठे शेडनेट उभारण्यात आले. तसेच टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते फळभाज्यांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी टाटा मोटर्सचे एच आर ऑफिसर शितलताई जगताप श्री.मिलिंदजी जोशी, शाळा समितीचे सदस्य मा. श्री. धनंजयजी वाडेकर मा. श्री. विक्रम शेठ बाफना ,सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक मा. श्री. नवनाथजी ठाकर ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे मॅडम, माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. तुकाराम पवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, टाटा मोटर्सचे कर्मचारी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्री. तुकाराम पवार सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र जगताप यांनी केले .शाळा समितीचे सदस्य मा.श्री.धनंजय वाडेकर सर यांनी पुढील पाच वर्षांमध्ये शाळेचे गुणवत्तेच्या संदर्भातील प्लॅनिंगची सविस्तर माहिती दिली . टाटा मोटर्स CSR नियोजनप्रमुख श्री. मंगेशजी जोशी यांनी टाटा उद्योग समूहाबद्दल सविस्तर माहिती दिली. HR ऑफिसर शितलताई जगताप यांनी शालेय आठवणींना उजाळा देत मुलींना आत्मविश्वासाने जीवनात यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन केले. कु.प्रेरणा साळुंखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना रोपांविषयी गांडूळ खतांविषयी, शेती करण्याच्या संदर्भातील सखोल असे मार्गदर्शन केले . कृषी सितारे म्हणजे शाळेचे विद्यार्थी व टाटा मोटर्सचे कर्मचारी यांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही रोपांची सर्वस्व निगा राखू अशा प्रकारचं आश्वासन दिले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. अजित डुंबरे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें