वेंकटेश्वर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कामशेत : वेंकटेश्वर शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार  सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उत्साहात साजरे करण्यात आले.या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची खास थीम होती “धरोहर”,जी आपल्या सांस्कृतिक वारसाला उजाळा देणारी होती.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक साहिल खत्री,चेअरमन नागेंद्र सोलंकी,मुख्याध्यापिका सॅन्ड्रा चिमा,प्रशासक उपदेश काहलों,इव्हेंट कॉर्डिनेटर ऐश्वर्या जाधव व डान्स कोरिओग्राफर निकिता स्वामी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


या स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना, स्वागत गीत घेण्यात आले. त्यानंतर स्त्रियांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या कार्याला उजाळा देणारे नृत्य सादर करण्यात आले. स्त्री शक्तीचा जागर करणारे झाशीच्या राणीचे नृत्य झाले. आरंभ हे प्रेरणादायी गीत मुलांनी सादर केले. महिला स शक्ती करण या अंतर्गत स्त्री शिक्षण संदर्भात उत्कृष्ट नाटिका सादरीकरण झाले.
स्त्रियांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या महान स्त्रियांची वेशभूषा करून त्यांचा परिचय देण्यात आला यामध्ये प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, इंदिरा गांधी, आनंदी गोपाळ जोशी,कल्पना चावला यांच्या अनमोल कार्याला उजाळा देण्यात आला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यप्रस्तुतींनी आणि मनमोहक सांगीतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शाळेतील विद्यार्थ्यांचे शक्ती हाऊस, शौर्य हाऊस, पराक्रम हाऊस, उत्कर्ष हाऊस या गटामध्ये विभाजन करून शाळांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मुख्याध्यापिका  सेंड्रा चिमा यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पराक्रम हाऊस ला प्रथम क्रमांक मिळाला.
या रंगारंग सांस्कृतिक सोहळ्याला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. वेंकटेश्वर शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी, शिक्षण आणि संस्कार यांचा उत्तम मिलाफ घडवणारी संस्था म्हणून ओळखली जाते.
या कार्यक्रमासाठी संगीत शिक्षक म्हणून ओमप्रकाश नवरे यांनी काम केले असून कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थी प्रतिनिधी खुश सोलंकी व आराधना मिश्रा केली तर समारोप विद्यार्थ्यांनी आभार प्रदर्शन करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें