कामशेत :- शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी कडुन कामशेत येथील रेल्वे चाळीच्या भागात अनुचित प्रकार घडत असुन शाळा भरताना व सुटताना शालेय विद्यार्थीची वादविवाद, मारामारी असे अनेक प्रकार घडत आहे. तरी दोन्ही वेळेला पोलीस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे
विद्यार्थी कडुन मुलीची छेडछाडचे अनेक प्रकार घडत. अल्पवयीन मुले बाईकस्वार, ट्रीपल सिट बाईक चालवणे, कर्कश हॉन चालवणे तसेच शाळा व कॉलेज सुटन्याच्या व भरण्याच्या वेळेस शाळेच्या आवारात फेऱ्या मारणे असे बरेच प्रकार काही महिन्यापासुन घडत आहेत. तरी सर्व विषयांचा विचार करुन शाळा व कॉलेज सुटायच्या व भरण्याच्या वेळेस दोन पोलिस कर्मचारी शाळेच्या आवारात बंदोबस्तासाठी ठेवावे असे निवेदन कामशेत पोलीस स्टेशनला सह्यादी विद्यार्थी अकादमीची वतीने देण्यात आले या वेळी केदार डाखवे,सचिन शेडगे,चेतन वाघमारे,वैभव हजारे,अनिश शर्मा,सुभाष भोते आदी जण उपस्थित होते



