वडगाव मावळ : दि. २६ डिसेंबर मंगरुळ ( आंदर मावळ ) येथे मोठ्या प्रमाणावर गावालगत खाण व्यवसाय चालू असून त्यामध्ये दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेचे ब्लास्टिंग वापरण्यात येते त्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत व घरांवरील पत्रे फुटलेले आहेत तसेच खाणीवर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चा वापर केल्यामुळे घरांचे शेतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होत आहे तसेच सदर ब्लास्टिंग केल्यामुळे जीवित हानी होऊन अनुचित प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधितांवर योग्य ती कारवाई करून मौजे मंगरुळ येथील गावालगतच्या खाणीतील ब्लास्टिंग पूर्णपणे बंद करण्यात यावी अन्यथा ग्रामस्था मार्फत मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मावळ तालुका आमदार सुनीलअण्णा शेळके आणि तहसीलदार मावळ… यांना देण्यात आले.
या वेळी आंबळेसरपंच सौ.आशा संपत कदमउपसरपंच श्री. तानाजी तुकाराम पवार सदस्य श्री.सागर यशवंत पवार, सौ. रुपाली कैलास चव्हाण, सौ.स्वाती जयेश शेटे,श्री.भानुदास मारुती कदम, श्री. नवनाथ रघुनाथ मोढवे,सौ. रेखा विलास भालेराव, सौ. सुनिता सतिश पिलाणे,सौ. आशा विलास भांगरे,संदीप गायकवाड, भरत घोजगे, नामदेव जुगदार, शशिकांत चव्हाण,शाम पवार,वैभव चव्हाण, संतोष चव्हाण, सुधार्शन चव्हाण, गणेश चव्हाण, संजय चव्हाण, यशवंत चव्हाण, आकाश चव्हाण,आदी मंगरूळ ग्रामस्थ उपस्थित होते.



