मनाची पाहिली पालखी: लोणावळ्यातून शिर्डीकडे साईभक्तांची पायी यात्रा सुरू

लोणावळा : मावळ तालुक्यातील लोणावळा येथून श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मनाची पाहिली पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे. या पायी यात्रेत साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, लोणावळा ते श्री क्षेत्र शिर्डी हे अंतर भक्तगण 8 दिवसांत पूर्ण करणार आहेत.


या पालखी सोहळ्यात सहभागी भक्तांमध्ये भाविकतेचा माहोल दिसून येत आहे. भजन, कीर्तन, आणि साईनाथांच्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. श्री साई सेवा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी ही पालखी यात्रा आयोजित केली जाते.


साईभक्तांची श्रद्धा आणि भक्तीमुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे. लोणावळा ते शिर्डी या मार्गावर विविध ठिकाणी भक्तांच्या स्वागतासाठी मंडळाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये पोहोचताना भक्तांचे स्वागत आणि श्री साईंच्या दर्शनाचा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें