लोणावळा : लोणावळा नगरपालिका सेवक वर्गाची पतसंस्था यांच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला.
संघाचे कर्णधार श्री. हर्षल धुळे यांच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करत अंतिम टप्प्यात शानदार प्रदर्शन केले. संघात श्री. श्रीकांत कंधारे, श्री. अभय लोंढे, श्री. बबलू रिले, श्री. निसार शेख, श्री. सुनील जाधव, श्री. संदीप लांडगे आणि श्री. यशवंत वाघमारे यांचा समावेश होता.
या स्पर्धेत लोणावळा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि मैत्रीपूर्ण खेळातून संघभावना व क्रीडासंस्कृतीचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जिंकताना खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आणि पुढील स्पर्धांसाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले.




