लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेचे मा. नगरसेवक श्री. देविदास भाऊसाहेब कडू आणि सौ. सुषमा देविदास कडू यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भाऊसाहेब कुंज, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा येथे संपन्न होणार आहे.
हळदीकुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीतील एक पारंपारिक सण असून, सौभाग्यवती महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. महिलांनी एकत्र येऊन हळदीकुंकू लावून एकमेकींना शुभेच्छा देण्याची प्रथा या समारंभाच्या निमित्ताने जपली जाते. तसेच, अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते.
लोणावळा परिसरात यापूर्वीही हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले असून, यंदाही महिलांना सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.



