MPN Marathi

लोणावळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्यात महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज फडकवत जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी नासीर शेख, अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, लोणावळा शहर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, दत्ता गोसावी, सचिन कालेकर, संतोष कचरे, सुधीर कदम, विनोद होगले, कौशल बनसोडे, अजिंक्य कुठे, हेमंत मुळे, शेखर वर्तक, अजय गोंदिया, अभय परदेसी, समीर भालेराव, अर्जुन सुळे, रवी भोईने यांसह अनेक शिवभक्त आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरभर जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झालेला हा सोहळा शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें