लोणावळा: महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लोणावळा नगरपरिषद कार्यालयात आज (दि. 28 मार्च 2025) दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात लोणावळा नगरपरिषद हद्दीतील एकूण 238 नोंदणीकृत दिव्यांग नागरिकांना 71,40,000 रुपये निधीचे वाटप करण्यात आले.
प्रत्येक दिव्यांगाला 30,000 रुपये थेट खात्यावर
प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याच्या खात्यावर 30,000 रुपये थेट जमा करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. निधी मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांनी नगरपरिषदेचे आभार मानले.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे,शकील शेख तसेच पत्रकार श्री. विशाल पाडाळे, श्री. विशाल विकारी, श्री. संजय पाटील, श्री. सागर शिंदे तसेच लेखा विभागाचे लेखापाल निलेश काळे, सतिश गावडे, दिव्यांग निधी विभागाच्या सुनिता जाधव, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर, कर्मचारी बबन कांबळे, अनंता टेमघरे हे मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र राऊत यांनी केले. निधी जमा झाल्यानंतर दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त केला व लोणावळा नगरपरिषदेचे मन:पूर्वक आभार मानले.



