ओवळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संतोष साठे बिनविरोध

ओवळे (ता. मावळ) येथे 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. संतोष काशिनाथ साठे यांची बिनविरोध निवड झाली. सुरुवातीला शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते अजित शिंदे यांनी निवडणुकीवर आक्षेप घेत गटविकास अधिकारी श्री. कुलदीप प्रधान यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांच्या मार्गदर्शनानंतर आणि गावाची बिनविरोध परंपरा जपण्यासाठी त्यांनी माघार घेतली. अखेर ही निवड अजित शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्य केली. शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे आभार मानत सकारात्मक भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें