मावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी श्री. अशोक वसंतराव कुटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
या वेळी श्री. कुटे यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी पक्षाच्या उद्दिष्टांना व नीतिमूल्यांना अनुसरून मावळ तालुक्यात मनसेचा झेंडा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे मावळ तालुक्यात मनसेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.



