डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भव्य कार्यक्रम

तळेगाव दाभाडे (१४ एप्रिल) : आज सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली पद्धतीने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार मा. सुनिल आण्णा शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा गणेशजी भेगडे, गणेश खांडगे, मा. नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, मा. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, तळेगाव शहराध्यक्ष संदीप शिंदे, तानाजी गडकर, दिलीपराव डोळस, किसन खंडागळे, जयवंत बनसोडे, मा. उपनगराध्यक्ष वीणा संदीप शिंदे, स्मिता कांबळे, कुंदा अहीरे, संध्या जाधव, प्रगती पाटील, संगिता गायकवाड, मीना शिंदे, आशा ओव्हाळ, नाईकनवरे मॅडम, जयंती महोत्सव अध्यक्ष गौतम आडाळे, अविनाश ओव्हाळ, नितिन मुळे, राहुल गायकवाड, गौतम अहीरे, सिद्धार्थ कदम, अरुण शिंदे, राजेश कांबळे, प्रविण ओव्हाळ, संजय वाघमारे, सुनिल तुळवे, मनोहर पगारे, सचिन भवार, इंगळे गुरूजी आणि लंकेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि सामाजिक समतेचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें