लोणावळा : श्री. साई सेवा नागरी पतसंस्था मर्यादित, लोणावळा या प्रतिष्ठित संस्थेची भागरवाडी येथे नवीन शाखा भव्य उद्घाटन समारंभाने सर्व नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. या उद्घाटनामुळे भागरवाडी व परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी एक विश्वासार्ह व सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.


या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक व संचालक श्री. अनिल रामचंद्र चिंचवडे, अध्यक्ष अॅड. श्री. अशिव बबन पाठारे, साय अॅड. आबासाहेब दत्तु मरवडी, सेक्रेटरी श्री. कृष्णा सोपान घिसरे, खजिनदार श्री. भारत रमेश चिकणे, तसेच संचालक मंडळातील श्री. शंकर किसन मंगवडे, श्री. गणेश गजानन मानकर, श्री. निलेश किसन नानेकर, श्री. गणेश बाळु येवले, सौ. सुरेखा जयवंत देशमुख, सौ. मानसी दत्ता लोकरे यांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.
तसेच, कु. मानसी दत्तात्रय घाणेकर यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली असून, नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सर्वपक्षीय नेते व स्थानिक पत्रकार बांधवांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या शाखेला शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.



