मावळ: पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी 100% निकालाची नोंद केली आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
यंदा एकूण 59 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून 38 विद्यार्थ्यांनी उच्च प्रथम श्रेणीत, 15 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:
- प्रथम क्रमांक: वैष्णवी शशिकांत भोसले – 96.20%
- द्वितीय क्रमांक: सई अतुल बोराडे – 95.80%
- तृतीय क्रमांक: राखी चंद्रभूषण केवट व हरिओम रामानयन यादव – 94.80%
मावळचे आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे शिक्षक, पालक आणि संपूर्ण विद्यालय कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब बाबुराव शेळके, उपाध्यक्ष संतोष शेळके, सदस्य संदिपनाना शेळके, सदस्य सौ. मोनिका संजय शेळके, श्री. संजय बाळासाहेब शेळके तसेच मुख्याध्यापिका रत्नमाला कापसे व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही यशोगाथा शाळेच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे प्रतीक ठरली आहे.



