कामशेत : मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या एकत्रित हितासाठी आणि ग्रामीण पत्रकारितेचा विकास साधण्यासाठी कामशेत येथे ‘कामशेत ग्रामीण पत्रकार संघ’ या नवीन पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या संघाच्या स्थापनेसोबतच २०२५-२०२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.संघाचे अध्यक्षपद चेतन वाघमारे यांच्याकडे देण्यात आले असून, उपाध्यक्ष म्हणून सुभाष भोते, सचिव प्रफुल्ल ओव्हाळ, तर खजिनदार सागर शिंदे यांची निवड झाली आहे.तसेच, पत्रकार परिषद प्रमुख म्हणून शिवानंद कांबळे, सल्लागार राजेंद्र कांबळे, संघटक उत्तम ठाकर, आणि सदस्य म्हणून सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकार संघटनात्मकदृष्ट्या बळकट होणार असून, ग्रामीण भागातील पत्रकारांना आवश्यक ते सहकार्य व प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.



