कामशेत : कामशेत ही ७० गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार (दि.०६) शिवस्मारकाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत स्मारकाच्या भूमिपूजना साठी उपस्थित नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण होते. आमदार शेळके यांनी यावेळी स्मारक हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे सांगत लोकांच्या सहकार्याने स्मारक लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



