लोणावळा, 21 जून – लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशनने ओला-उबेर अॅप विरोधात पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे विशेष आभार मानले आहेत.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार शेळके यांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ओला-उबेर बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दिनांक ५ जून २०२५ रोजी लोणावळ्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही आमदार शेळके यांनी हा विषय ठामपणे मांडला.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. संघटनेने लवकरात लवकर ओला-उबेर अॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत शेळके यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.



