लोणावळ्यात जयहिंद लोकचळवळतर्फे डिलिव्हरी बॉय (रायडर) साठी भव्य मेळावा

लोणावळा | प्रतिनिधी
रोजच्या धावपळीच्या जीवनात घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉय (रायडर्स) यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी जयहिंद लोकचळवळ, लोणावळा यांच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन महिला मंडळ हॉल, हुडको, लोणावळा येथे करण्यात आले.

या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन जयहिंद लोकचळवळचे संस्थापक श्री. निखिल दादा कविश्वर यांनी केले. यावेळी हाजी अब्बास भाई खान, ऍड. शुभम रविंद्र जोशी, कु. चैतन्य प्रदीप वाडेकर, प्रसाद घोडके, स्वप्नील ढाकोळ, शुभम पोटफोडे, ऋषिकेश भानुसघरे, गणेश चोरगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित रायडर्सनी कंपन्यांकडून होणारा अन्याय, पोलिस प्रशासनाच्या अडथळ्यांची समस्या तसेच कामाच्या अटी व मोबदल्यासंदर्भात आपल्या अडचणी मांडल्या. या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत श्री. निखिल कविश्वर यांनी सांगितले की, “तुमच्या प्रत्येक अडचणीवर जयहिंद लोकचळवळ तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आम्ही भांडवलदार कंपन्यांच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करतो, मात्र लोणावळ्यातील युवकांना या क्षेत्रात रोजगार मिळतो ही बाब सकारात्मक आहे. त्यामुळे आमची चळवळ डिलिव्हरी बॉयच्या हक्कासाठी सदैव कार्यरत राहील.”

ते पुढे म्हणाले की, “अ संघटित कामगार हे समाजाचं खरं बळ आहेत. त्यांना आवाज देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे ध्येय आहे. लोणावळा शहरातील विविध स्तरांतील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी जयहिंद लोकचळवळ एक मजबूत व्यासपीठ बनत आहे.”

या मेळाव्याच्या माध्यमातून रायडर्सच्या समस्यांना आवाज मिळाला असून, भविष्यातही त्यांना संघटित करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार जयहिंद लोकचळवळने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें