मावळ प्रतिनिधी : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ” ब्युटी ऑफ लाईफ ” द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर पुस्तकाच्या लेखिका प्रसिद्ध उद्योजिका आशा नेगी यांनी मुलाखतीद्वारे कला,वाणिज्य,विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी समोर स्वतःला झालेल्या कॅन्सर विषय अनुभव व्यक्त करताना सांगितले की ” आयुष्यात जे झालं आहे ती स्विकारण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे.कॅन्सर झाल्यानंतर योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.तसेच कॅन्सर होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी व्यायाम आहार तसेच करिअर आणि कॅन्सर यांचा समतोल साधता आला पाहिजे तसेच जीवनात आलेल्या दुःखाला देखील आनंदाने मॅनेज करता आलं पाहिजे.
यावेळी मॉडेलिंग चित्रपट मालिका नाट्य इव्हेंट मॅनेजमेंट सेलिब्रिटी मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील अनुभव मुलाखतीद्वारे कथन केले.जन्माने नाॅर्थ इंडियन असली तरी कर्माने मी महाराष्ट्रीयन आहे.तसेच तळेगाव विषय मनात नितांत प्रेम कायम असल्याची भावना व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे समन्वयक संदिप काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य प्रा.सदिप भोसले,गोरख काकडे यांनी जीवनपट उलगडून सांगण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली तसेच जो सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.संदिप भोसले यांनी केले.लेखिका परिचय प्रा.विजय खेडकर यांनी केला तर सदर मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे सचिव प्रा.योगेश घोडके यांनी घेतली.
सूत्रसंचालन प्रा.योगिनी हुलावळे तर आभार प्रा.मेघा कुटे यांनी यांनी मानले.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. उत्तम खाडप वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.विना भेगडे कला विभाग प्रमुख प्रा.केशव जाधव पर्यवेक्षिका प्रा.उज्वला दिसले स्टाफ सेक्रेटरी प्रा.राजाराम डोके सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हर्षदा पाटील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.शिवाजी जगताप तसेच क्रीडा विभाग सदस्य प्रा.चौधरी प्रा.जगताप प्रा.भुजबळ प्रा.दिवसे प्रा.हुलावळे प्रा.खेडकर तसेच स्नेहल भेगडे, सविता जोंधळे, अनुराधा पोंदे,सायली मोटे आदींचे सहकार्य लाभले.





