लोणावळा : नेपाळी समाज मंडळ, लोणावळा यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे हरितालीका तिज निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला लोणावळ्याचे कर्तव्यनिष्ठ व जनसेवक नगरसेवक देविदासभाऊ कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत (दादा) धुमाळ, मंगेश देशपांडे व शिळीमचे सरपंच सनी कडू यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी अध्यक्ष बल्लु बडेला यांनी केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समाजातील महिला सदस्य मोती बुढथापा, राधिका खडका, ईशा जोशी, सचिना पराजुले व लक्ष्मी बडेला यांनी साल व सन्मानचिन्ह देऊन केले.
या वेळी हरितालीका तिज आणि मराठीतील मंगळागौर यांतील साम्य स्पष्ट करताना माजी अध्यक्ष बल्लु बडेला म्हणाले,
“या दोन्ही सणांमध्ये सासुरवाशीण महिला माहेरी येऊन आई-वडील, बहीणी, मैत्रिणींबरोबर सुख-दुःख व्यक्त करतात. तिजच्या दिवशी महिला पतीसाठी निर्जला उपवास करतात आणि संध्याकाळी नवरा आपल्या हाताने पाणी पाजून उपवास सोडवतो.”
प्रमुख पाहुणे देविदासभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या अडचणींमध्ये नेहमी पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष सिडी जोशी, उपाध्यक्ष श्याम गुरूंग, सचिव मोहन पराजुले, कोषाध्यक्ष आशिष भंडारी, सहसचिव दिपेंद्र खडका, सल्लागार अर्जुन बुढथापा, सदस्य लालू बुढथापा, चक्रबहादुर कुँवर, पदम बुढथापा, दिपक जोशी, बुद्धिमान गुरुंग तसेच महिला सदस्य कला सापकोटा, बिमला गुरूंग, पदमा अधिकारी, लक्ष्मी जोशी, भावना भुल, करुणा भुल, कौशील जोशी, हिवकला बुढथापा आणि लोणावळ्यातील विविध भागातील शेकडो नेपाळी महिला भगिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष सिडी जोशी यांनी सर्व मान्यवर पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.



