तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना धनुर्वात लसीकरण

तळेगाव दाभाडे : नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले.

या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य श्रीशैल मेंथे, प्रमोद दाभाडे, प्रसाद मुंगी तसेच डॉ. वर्षा वाडकर व डॉ. नेहा कुलकर्णी यांच्या सहकार्याने नगरपरिषदेतील सर्व चतुर्थ श्रेणी स्वच्छता कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांचे लसीकरण करण्यात आले. एकूण २५० कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले.

कार्यक्रमादरम्यान उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी रोटरी क्लब अध्यक्ष श्रीशैल मेंथे व डॉ. नेहा कुलकर्णी यांचा सत्कार केला. तसेच आस्थापना विभाग प्रमुख नेहा पाटील यांनी डॉ. वर्षा वाडकर, प्रसाद मुंगी व प्रमोद दाभाडे यांचा गौरव केला.

लसीकरणानंतर मार्गदर्शन करताना डॉ. नेहा कुलकर्णी म्हणाल्या, “स्वच्छता कर्मचारी हेच प्रत्यक्षात समाजाच्या आरोग्याचे रक्षक आहेत. त्यांच्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य टिकून राहते. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, आणि धनुर्वात लस त्यासाठी प्रभावी संरक्षण देते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें