नऊलाख उंब्रे (मावळ): आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली नऊलाख उंब्रे गावातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यात आली. या भेटी दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी, महिलांनी व युवकांनी दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
या दौऱ्यात विशेष आकर्षण ठरले ते कांगाई तरुण मंडळाचे साकडे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या चरणी प्रशांत दादांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना केली. गावोगावी निर्माण झालेली जनआस्था, कार्यकर्त्यांशी असलेली दादांची घट्ट नाळ आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची दृष्टी यामुळे दादांच्या नेतृत्वाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.यावेळी आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली जाधववाडी येथील जय हनुमान तरुण मंडळ तर बधलवाडी येथील हनुमान तरुण मित्र मंडळ , मुक्ताई मित्र मंडळ , भैरवनाथ मित्र मंडळ , बोधलेबुवा मित्र मंडळ , गणेश मित्र मंडळ , जय गणेश मित्र मंडळ , सिद्धीविनायक मित्र मंडळ तसेच मिंडेवाडी येथील छत्रपती मित्र मंडळ , कांगाई देवी मित्र मंडळ , जय गणेश मित्र मंडळ त्याचप्रमाणे परिटवाडी व नऊलाख उंब्रे येथील जय हनुमान मित्र मंडळ , श्रीराम मित्र मंडळ, दत्तकृपा तरुण मंडळ, शिव साम्राज्य तरुण मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, भोलेनाथ मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, काल भैरवनाथ मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, चावसर मित्र मंडळ या सर्व मंडळांना भेटी देण्यात आल्या.
या दौऱ्यात प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत युवा मंचचे कार्यकर्ते रवी कडलक, नवनाथ पडवळ, बळीराम मराठे, नंदकुमार भागवत, राजू कडलक, गणेश शिंदे यांच्यासह असंख्य युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तर प्रमुख मान्यवरांमध्ये माऊली उडाफे, विशाल घोलप, गौरव शेटे, उमेश कदम, काबू पवळे, मोहन दरेकर, माऊली दळवी, संतोष उडाफे, अरविंद बधाले, राजू बधाले, बंटी नरवडे, वेदांत उडाफे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
या दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत दादा भागवत हे सक्षम, तरुण आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. गावागावातील प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि विकासाला गती देण्याची दृष्टी दादांकडे आहे. म्हणूनच आमच्या गावातील जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा आहे.”
गणेशोत्सव हा श्रद्धा, ऐक्य व सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्याच पार्श्वभूमीवर झालेला हा दौरा प्रशांत दादा भागवत यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे जिवंत द्योतक ठरला आहे.
मावळ तालुक्यातील राजकारणात एक सक्षम, तडफदार व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून प्रशांत भागवत पुढे सरसावले असून, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे उमेदवारीवर मोठे लक्ष केंद्रित झाले आहे.





