
सांगवी – सांगवी ग्रामस्थ आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरंजन संध्या 2025” हा सांस्कृतिक सोहळा जल्लोषात पार पडला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमात पारंपरिक उखाणे, प्रश्नमंजुषा, हास्यस्पर्धा, मजेशीर खेळ आणि धमाल गप्पांचा समावेश होता. महिलांच्या या उत्साही सहभागामुळे संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.
मान्यवरांची उपस्थिती
मा. सरपंच सौ. मनीषाताई लालगुडे, मा. सदस्य श्री. महादूनाना खांदवे, मा. उपसरपंच सौ. रखाबाई भोईर, मा. कुंदाताई खांदवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच ऋषिकेश लालगुडे, नवनाथ तोडकर, विकास लालगुडे, रोहित खांदवे, संभाजी तोडकर, मनोज खांदवे, दिनेश लालगुडे, किरण लालगुडे, श्री. राजाराम ओव्हाळ, गणेश ओव्हाळ, अभिषेक खांदवे, कानिफनाथ तोडकर, सुधाकर लालगुडे, अक्षय तोडकर, शेखर तोडकर आदींची विशेष उपस्थिती होती.
महिलांचा सहभाग ठळक वैशिष्ट्य
प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात महिलांचा सक्रिय सहभाग दिसून आला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला या कार्यक्रमामुळे अधिक गती मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
“ग्रामीण विकासासाठी महिलांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे, त्यांच्या उत्साहातून समाज बदलाची दिशा ठरते,” असे प्रशांत दादा भागवत यांनी सांगितले.
सांगवीतल्या या कार्यक्रमाने ग्रामस्थांच्या एकोप्याचा आणि महिलांच्या उत्साही सहभागाचा ठसा उमटवला.






