राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान जल्लोषात स्वागत
मावळ तालुक्यातील विविध वाड्यावस्त्यांवर जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचा दौरा उत्साहात सुरू आहे. राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये गणेश मंडळांच्या भेटीला गेल्यावर ग्रामस्थांनी आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचासह प्रशांत दादांचे जोरदार स्वागत केले.
गावागावात फटाके फोडून आणि जल्लोषात दादांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांना आपला पाठींबा दर्शवला. गावातील गणेश मंडळांनीही पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात दादांचे स्वागत करून वातावरण अधिकच उत्साही केले.
या प्रसंगी प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत नवनाथ पडवळ, रवी कटलक, संतोष जांभूळकर, जालिंदर शेटे, प्रकाश अगाळमे, विठ्ठल मोहिते, रामदास शिंदे, संकेत शिंदे, भानुदास शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, तुषार आगळमे, सचिन खाणेकर, चंद्रशेखर नवघणे, संतोष काकरे, अॅड. प्रणव गाडे, रामेश्वर नवघणे, जतिंद्र बोर्हाडे, कुणाल बोर्हाडे, अमोल पोटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या प्रतिसादाबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले की, “प्रशांत दादा भागवत यांचा साधा आणि जमिनीवरचा स्वभाव, तसेच युवकांसाठीच्या त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय. ग्रामविकासासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि दादांच्या रुपाने हे नेतृत्व आम्हाला लाभणार आहे.”
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत दादा भागवत हे इच्छुक उमेदवार म्हणून गावोगाव दणदणीत प्रतिसाद मिळवत आहेत. त्यांच्या भेटीगाठींमुळे वातावरणात राजकीय चैतन्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांच्या उत्साहातून त्यांना मिळत असलेला पाठिंबा आगामी निवडणुकीत प्रशांत भागवत यांची ताकत वाढणार असल्याचे दिसून येत आहे.



