जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत भागवत यांना मोठा सकारात्मक प्रतिसाद – ब्राह्मणवाडी (साते) येथे ‘मनोरंजन संध्या 2025’ ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

साते – मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी (साते) येथे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित मनोरंजन संध्या 2025 अत्यंत उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावागावातील महिलांनी पारंपरिक व आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. या स्पर्धेत  प्रथम क्रमांक – पुष्पलता बोऱ्हाडे यांनी तर द्वितीय क्रमांक -माधुरी नवघणे तृतीय क्रमांक -रेखा विनोदे यांनी पटकावला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णा ताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा ताई घोजगे, मा. सरपंच वर्षा ताई नवघणे, मा. उपसरपंच संध्या ताई शेळके, वंदना शिंदे, अश्विनी विनोदे, कविता विनोदे, विद्या शेवकर, सोनल सुर्यवंशी यांच्यासह गावातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रशांत दादा भागवत यांनी नेहमीच गावागावातील महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.” कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळातील महिलांची एकजूट अधोरेखित झाली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचे पाठबळ हेच प्रशांत दादा भागवत यांच्या विजयाचे मुख्य बळ ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें