जांभवडे (मावळ ) – ग्रामदैवत श्री चौंडई देवी मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास असा “खेळ रंगला पैठणीचा” हा आगळावेगळा कार्यक्रम जांभवडे गावात आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजक खेळ, गमतीदार स्पर्धा आणि आनंदी वातावरणामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले. महिलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सौ. पुनम नाटक, सौ. पूजा प्रकाश भोसले, माजी उपसरपंच वैशाली भांगरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनीता भांगरे, सौ. ज्योती शिंदे, सौ. सायली घोजगे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता घोजगे आणि सौ. सारिका शिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. सोपान भांगरे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ तालुका) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. स्वप्निल भांगरे (कामगार नेते) यांनी मानले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेला हा आगळावेगळा कार्यक्रम मावळातील सांस्कृतिक उत्सवात नवीन ऊर्जा घेऊन आला. समाजातील सर्वच घटकांचा सहभाग वाढवून एकोप्याला चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
प्रशांत दादा भागवत, जे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत, यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम घडून आला. महिलांच्या सहभागातून गणेशोत्सव अधिक उत्साही व प्रेरणादायी करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे स्पष्ट जाणवले.












