मावळ : सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारे प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ येत्या रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, शिवराज पॅलेस, जांभूळ फाटा येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके आणि सौ. सारिकाताई शेळके प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार असून, स्पर्धकांच्या कलेला आणि परिश्रमाला योग्य तो गौरव मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला मावळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचशे पेक्षा जास्त महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पारंपरिक, निसर्गस्नेही आणि नवकल्पक सजावटींनी स्पर्धा रंगतदार झाली. या उपक्रमातून समाजातील एकोप्याला चालना मिळाली तसेच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी नाते घट्ट करण्याची प्रेरणा मिळाली.त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना बक्षीस देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे
प्रशांत दादा भागवत, जे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आहेत, यांच्या वतीने राबवण्यात आलेला हा उपक्रम फक्त स्पर्धा नसून मावळच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरणार आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याची ताकद या उपक्रमात आहे, हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
प्रशांत दादा भागवत युवा मंचाने सर्व स्पर्धकांना आणि मावळातील नागरिकांना आवाहन केले आहे की, या भव्य सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा भाग व्हावे.



