लोणावळा : शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून तरुणाई मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहे. थेरगाव येथील संपर्क कार्यालयात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते श्री. देवेंद्र कुलकर्णी, अभिषेक दळवी, मयुर मानकर, मयुर शेजवल व सौरव निकम या उत्साही तरुणांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.
या वेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रकाश पाठारे, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना पदाधिकारी सागर पाचर्णे, संकेत जाधव, वाहतूक सेना अध्यक्ष कल्पेश तिखे, तसेच प्रमोद जेधे, दुर्वेश कडू, दुर्वेश बोडके, प्रथमेश पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे लोणावळा परिसरातील शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.



