मावळ – गावागावांत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाची गोळेवाडीत धमाकेदार सुरुवात झाली. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला.
भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या सोहळ्याला आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माधुरीताई जाधव, माजी सरपंच अलकाताई जाधव, सुमनताई मापारी, रोहिदासजी जगदाळे, पोलीस पाटील भानुदाजी दरेकर, विष्णू गोळे, दत्ता लोंढे, सुरेश घोजगे यांच्यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते नामदेवभाऊ गराडे, भानुदास दरेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
वारिंगेवाडीत झालेल्या कार्यक्रमालाही महिलांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अहिल्याताई मांडेकर, अध्यक्षा दिपालीताई तोडकर, सचिव ज्योतीताई शिंदे, कार्याध्यक्ष मोहिनीताई मांडेकर, सचिव मंदाताई वारिंगे, उपाध्यक्ष अनिता करके, सचिव सुप्रिया कलवडे, सरपंच सरीखाताई धुमाळ तसेच अनिताताई सावले (बीजेपी महिला आघाडीच्या अध्यक्षा) या प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रशांतदादा भागवत म्हणाले,
“मनोरंजन संध्या २०२५ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर महिलांच्या सहभागातून गावागावात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम आहे. समाज घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या कलागुणांना आणि उत्साहाला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. या उपक्रमातून एकोपा, आत्मविश्वास आणि आनंदाची नवी प्रेरणा गावागावांत पोहोचेल, हीच खरी ताकद आहे. यापुढेही अशा संध्यांचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत राहणार आहे.”
या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला नवे व्यासपीठ मिळाले असून, मावळात सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



