लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पाला गती

पुणे- लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापन आणि सुशोभीकरण प्रकल्प नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यातील VVIP गेस्ट हाऊस येथे पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब अध्यक्षस्थानी होते.

बैठकीत लोणावळा शहरातील वाढत्या कचऱ्यावर उपाय म्हणून बायो-CNG प्रकल्प उभारणीचा आराखडा सादर करण्यात आला. सध्या लोणावळ्यात दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यात ओला, सुका, इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिक कचऱ्याचे योग्य विभाजन न झाल्याने समस्या निर्माण होत आहे. शिवाय जुन्या डंपिंग यार्डमध्ये साठलेल्या सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यामुळे गळतीचे पाणी, दुर्गंधी आणि पर्यटन शहराच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

प्रकल्पाचे उद्दिष्टे:

  • लोणावळा – खंडाळा स्वच्छ पर्यटन शहर घडविणे
  • आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे
  • जुन्या डंपिंग यार्डचे उच्चाटन करणे
  • १००% दैनंदिन कचऱ्याचे प्रक्रिया करणे
  • ‘लोणावळा – खंडाळा’ महाराष्ट्रातील आदर्श हिल-टाउन म्हणून विकसित करणे

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असून, लवकरच राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें