मावळ तालुक्यातील शारदेय नवरात्र उत्सवातील कुंकू मार्चन सोहळा यंदा राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याला हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
या सोहळ्यात आमदार सुनील शेळके यांनी देवीसमोर साकडं घालताना, “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात” अशी प्रार्थना केली. त्यामुळे मावळातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले प्रशांत दादा भागवत हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमटवलेले नाव आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते इच्छुक उमेदवार असून, त्यांना आमदार शेळके यांचा पाठींबा लाभल्याने त्यांची उमेदवारी आणखी भक्कम झाली आहे.
तालुक्यातील जनतेशी सातत्याने संपर्क, सामाजिक उपक्रमांतील आघाडीचे नेतृत्व आणि युवकांमध्ये लोकप्रियता या सर्व बाबींमुळे प्रशांत भागवत हे मावळात वेगाने उदयास येणारे नेतृत्व मानले जातात.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आमदार शेळके यांची खंबीर साथ म्हणजे प्रशांत भागवत यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी एक पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मावळात रंगतदार लढतीचे चित्र दिसण्याची शक्यता आहे.



