मावळ : मावळ तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे आमदार मा. सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५”चे आयोजन करण्यात आले.
वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या उपक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी आनंदी वातावरणात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
भर पावसातही महिलांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. त्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. महिलांचा हा प्रचंड पाठिंबा पाहता प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
वराळे येथील कार्यक्रमाला अस्मिता निलेश मराठे, सीमा विकास मराठे, अनिता रामदास मराठे, साक्षी राजू मराठे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व माता-भगिनी उपस्थित होत्या. तर आंबी गावातील कार्यक्रमाला बाळासाहेब घोजगे, भानुदास दरेकर, भरत घोजगे, प्रकाश घोजगे, राहुल बनसोडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले प्रशांतदादा भागवत हे गावोगावी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून थेट जनतेशी संपर्क वाढवत आहेत. “मनोरंजन संध्या २०२५” सारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या लोकप्रियतेला आणखी चालना मिळत असून राजकीय वर्तुळात त्यांच्या वाढत्या प्रभावाबाबत चर्चा सुरू झाली आहे.



