वराळे : प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकर्षक प्रकाशयोजना, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत-संगीत आणि मुलांच्या कलागुणांच्या सादरीकरणामुळे वातावरण रंगतदार झाले.
या कार्यक्रमात महिला मंडळासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय ठरला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा संध्याकाळीचा खास ठरला. सामाजिक ऐक्य व एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने प्रशांत दादा भागवत यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित केले.
मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत भागवत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. गावागावांतील उत्स्फूर्त प्रतिसाद, विशेषतः महिलांचा पाठिंबा, त्यांच्याबद्दलचा वाढता विश्वास दाखवतो. युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही त्यांच्या समाजाभिमुख कामाची दखल घेतली जात आहे.
कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, “राजकारण हे सेवेसाठी असते, सत्तेसाठी नव्हे. जनतेच्या विश्वासाची कदर करून समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे. युवक आणि महिलांचा विश्वास हीच खरी ताकद आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मनोरंजन संध्येसारख्या उपक्रमांतून समाजाशी थेट संवाद साधत सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी मिळते. त्यामुळे मावळात प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाभोवती नवी राजकीय ऊर्जा व परिवर्तनाची लाट उसळताना दिसत आहे.



