खंडाळा : मुंबई–पुणे जलद गती महामार्गावर (एक्सप्रेसवे) आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. हा प्रकार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 6.56 वा. KM 64/900 या ठिकाणी उघडकीस आला. मृत व्यक्ती महामार्गाच्या डाव्या बाजूच्या डिव्हायडरजवळ आढळून आली असून, घटनास्थळी कोणतेही अपघातग्रस्त वाहन दिसून आले नाही.
प्राथमिक पाहणीत हा प्रकार अपघाताचा नसून घातपाताचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API अवसरमोल, PSI राठोड, PC सय्यद, PC कांबळे, तसेच MSF जवान धुमाळ व पाटोळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
सदर ठिकाण खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रापासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे करीत असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



