कामशेत – सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने शिळीब (बोडशील) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्याद्रीचे दुर्गसेवक कै. भाऊ ढाकोळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बसकरही प्रदान करण्यात आले.
सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात येते, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या कार्यक्रमाला सचिन शेडगे, चेतन वाघमारे, केदार डाकवे, रवींद्र शिंदे, दर्शन वाघवले, प्रश्नन पार्ट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर दळवी यांनी केले, तर आभार सुनीता देशमुख व दिनेश चोरगे यांनी मानले.



