मावळ (प्रतिनिधी):
मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी व खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट घेतली.
या भेटीला युवानेते पार्थ पवार आणि प्रशांतदादा भागवत यांचीही उपस्थिती लाभली होती. त्यामुळे या भेटीने मावळच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
मेघाताई भागवत या अनेक वर्षांपासून स्थानिक विकासकामांमध्ये, महिला सक्षमीकरण उपक्रमांमध्ये आणि सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर आहेत. त्यामुळे इंदोरी-वराळे गटात त्या सर्वाधिक मजबूत दावेदार म्हणून ओळखल्या जातात.
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली ही भेट केवळ औपचारिक न राहता, विकासकामे, महिलांसाठी उपक्रम आणि पक्ष संघटन बळकटीकरण या विषयांवरही चर्चेचे सूर लागल्याचे समजते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, या घडामोडींमुळे मावळ तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.



