लोणावळा (प्रतिनिधी) : दिवाळीच्या मंगल प्रसंगी मेहता म्युझिकल आणि महिला मंडळ, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळ्यातील महिला मंडळ सभागृहात रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता “सप्तरंगी गीतरंग” हा सुमधुर संगीत कार्यक्रम संपन्न झाला.
या विशेष दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी गाण्यांची मनोहारी फुले उधळत ख्यातनाम गायिका मनिषा निश्चल, गायक राजेश मेहता आणि गायिका मीनाक्षी गायकवाड यांनी भक्तिगीते, भावगीते, अभंग, लावणी तसेच हिंदी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
🎶 संगीत साथ:
मनोज कदम (तबला), सुनील बोके (ऑक्टोपॅड), राकेश पवार (कीबोर्ड), चंद्रशेखर गायकवाड (ढोलक), क्रितेश भाविस्कर (बासरी) आणि चंद्रकांत जोशी (हार्मोनियम) यांनी दिली.
ध्वनी व्यवस्था — मनोज हरपुडे, रंगमंच — विशाल दिघे, प्रकाश व्यवस्था — प्रणित खानेकर यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे निवेदन बापूलाल तारे यांनी केले तर सौ. उमा मेहता यांनी उत्कृष्ट संयोजन केलं.
या कार्यक्रमात “सुंदर ते ध्यान”, “मोगरा फुलला”, “अबीर गुलाल”, “तोच चंद्रमा नभात”, “माळ्याच्या मळ्यामंधी पाटाचं पाणी जात”, “मला वेड लागले प्रेमाचे”, “अजीब दास्ताँ है ये”, “ये दिल और उनकी निगाहों के साये”, “लावणी – आली माझ्या घरी ही दिवाळी” अशी विविध गीते सादर झाली.
✨ उपस्थित मान्यवर:
या रंगतदार कार्यक्रमाला लोणावळेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, पांडुरंग तीखे, भगवान आंबेकर, माजी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर, रामदास दरेकर, विजय रसाळ, सुरेश गायकवाड, विवेक घाणेकर, डॉ. श्रीकांत रावण, समीर भल्ला, सुहास राणे, साहेबराव टकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार प्रदीप वाडेकर, ऍड. संजय पाटील, श्रीराम कुमठेकर, सुनिल म्हस्के, संतोषी तोंडे आदी पत्रकारही उपस्थित होते. तसेच मेहता, गोळपकर, गांधी, पिसे, साखरेकर, राणे, दामले, बांदल परिवारातील मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमासाठी महिला मंडळ अध्यक्ष मनिषा बांबोरी, उमा मेहता, मीनाक्षी गायकवाड, सुनिता रावण, श्रुतिका राणे तसेच सर्व महिला मंडळ कार्यकारिणी आणि सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिवाळीच्या या पहाटेने लोणावळ्याच्या सांस्कृतिक वातावरणात खरोखरच सूरांचा आणि आनंदाचा मंगल झंकार घडवला. 🎵✨












