“तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!”

तळेगाव ग्रामीण व गणपती मळा परिसरात इंदोरी–वराळे गटाच्या लोकप्रिय व प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत व प्रशांत दादा भागवत यांनी या वर्षीची दिवाळी खास पद्धतीने साजरी केली. भाऊबीज निमित्त मेघाताईंनी परिसरातील महिलांना भेटवस्तू देत स्नेहाचा वसा जपला, तर लहान मुलांबरोबर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. परिसरात उत्साह, आनंद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमात गणेशभाऊ शिंदे, अनिल जाधव, राहुल जाधव, शिवाजी जाधव, अश्विन केदारी, सुरेश केदारी, अशोक गावडे, कैलास पवार, राजू गावडे तसेच प्रशांतदादा भागवत युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांनी मेघाताईंच्या आत्मीय संवादाचे कौतुक केले आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा व्यक्त केली.

मेघाताई भागवत या जिल्हा परिषदेच्या वराळे–इंदोरी गटातून प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जनतेशी सलोख्याचे नाते जपत, प्रत्येक वाड्या-गावात जाऊन संवाद साधण्यावर भर दिला आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.

या दिवाळी स्नेहसंमेलनातून मेघाताई भागवत यांचा जनसंपर्क आणखी दृढ झाला असून, त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा ठसा इंदोरी–वराळे गटात स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताईंना या लोकसंपर्काच्या मोहिमेचा ठोस राजकीय फायदा होणार असल्याचा सूर उमटू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें