मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण रंगत घेत आहे. स्थानिक पातळीवर विविध इच्छुक आपला जनसंपर्क वाढवित असून नागरिकांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी गोळेवाडी परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी वडीलधारी मंडळी आणि महिलांनी त्यांच्याशी संवाद साधत सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली.
मेघाताई भागवत सामाजिक कार्य आणि महिलांच्या प्रश्नांवरील त्यांच्या सातत्यपूर्ण भूमिकेमुळे ओळखल्या जातात. त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या गटातील निवडणुकीबाबत सर्व पक्षांतर्फे चर्चेला वेग आला असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. नागरिकांशी होणाऱ्या संवादातून या निवडणुकीत उत्साहपूर्ण वातावरणाची चाहूल लागली आहे.












