वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांना “कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार” प्रदान

पुणे, दि. ४ फेब्रुवारी २०२६ – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत, पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) नीलकंठ गव्हाणे यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्यासाठी “कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि जनहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्र सूर्यवंशी तसेच DRDO चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व संचालक डॉ. अशोक गोविंद नगरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान समारंभ पद्मावती नगर येथील विणकर सभागृहात सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें