संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार, महिलांना साडी वाटप

तळेगाव दाभाडे (दि. २३) : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव स्टेशन परिसरातील नगरपरिषद हद्दीतील वार्ड क्रमांक २ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


कार्यक्रमात नगरसेवक संदीप नाना शेळके यांच्या वतीने शेकडो महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. “आपल्या दारात येणाऱ्या स्वच्छता दूतांचा आदरपूर्वक नमस्कार करा, त्यांचा सन्मान करा; शक्य असल्यास औक्षण करून फुलांचा वर्षाव करा,” असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला.
तसेच प्रत्येक परिसर, सोसायटी किंवा इमारतीमधील सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश आणि समाजसेवेची शिकवण जपणे, हीच खरी संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें