MPN Marathi

पृथ्वीराजबाबा, सिर्फ नाम ही काफी हैं, नेतृत्व करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असणार, बंटी पाटलांची फटकेबाजी

सातारा (कराड): एका बाजूला महायुतीचे भ्रष्टाचाराचे सरकार आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या लोकांना सरकार बनवून नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असणार आहे, असे विधान काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा पक्षाचे नेते खासगीत बोलताना सांगत आहेत. अशावेळी राज्याचे नेतृत्वात करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असेल, असे बंटी पाटील म्हणाल्याने अनेकांना भुवया उंचावल्या आहेत.

साताऱ्याच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते अतुल भोसले यांच्यात लढत होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराला सतेज पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी बंटी पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करून महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा दबदबा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी हैं…!

सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. नेतृत्व करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. एवढा मोठा माणूस तुम्हाला मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी हैं…! कुठेही जावा, पृथ्वीराज बाबांच्या गावातून आलोय म्हटलं की काम होतंय, कुठेही अडचण येत नाही. एवढे वजनदार नाव पृथ्वीबाबांचं आहे, आता त्या नावाला साजेशे मताधिक्य मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे सतेज पाटील म्हणाले.

विरोधकांच्या बाजूने पैशाचा महापूर येईल पण बळी पडू नका, पृथ्वीराजबाबा येणारच!

विरोधी पक्षाकडून काही अप्रचार होईल, काही टीका टिप्पणी होतील त्याकडे दुर्लक्ष करा, अशा सूचना करतानाच विरोधकांकडून पैशाचा महापूर येईल, परंतु काळजी करायचं काम नाही, पलीकडून पैशांचा महापूर असेल पण आपल्या बाजूला मतांचा महापौर येईल, महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सरकारची वाट बघत आहे, असे सतेज पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें